S M L

शिवसेनाप्रमुखांनी केली वरुण गांधींची पाठराखण

18 मार्च दोन धर्मांमध्ये तेढ वाढेल अशी प्रक्षोभक वक्तव्यं आपल्या भाषणात करणा-या भाजपचे युवा उमेदवार वरुण गांधी यांची पाठराखण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. 'वरुण खरं बोलला, आम्हाला हा गांधी चालेल' या शीर्षकाखाली ' सामना 'मध्ये आज अग्रलेख लिहिला आहे. वरुण गांधींनी केलेल्या वक्तव्यात चूक काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच आचारसंहितेच्या बेड्या सत्य आणि न्याय जखडून ठेवू शकत नाही असा दावाही या लेखात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मतदार संघात भाजपचे तरुण युवा उमेदवार आणि मनेका गांधीचे पुत्र वरुण गांधी यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असं भाषण 6 मार्चला प्रचार सभेत केलं होतं. त्या दिवशी पिलीभीत मतदार संघात त्यांनी मुस्लिमांवर टीकेची झोड उठवली होती. सर्व हिंदूना एका बाजूला करून ' उरलेल्यांना ' पाकिस्तानात पाठवायला हवं, असे उद्गार काढल्याचा वरुण गांधी यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पिलीभीत जिल्हाधिका-यांनी कलम 153 - अ, 123 - अ आणि 123 - ब या कलमांखाली अजामीनपात्र गुन्हा आणि भाजपला ही नोटीस बजावली आहे. वरुण गांधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. सभेत वरुण गांधींनी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वाचीही खिल्ली उडवली होती. कुणी एका गालावर थप्पड मारली तर पुढचा गाल पुढे करणं ही आपण ऐकलेली आजवरची सर्वात मूर्खपणाची गोष्ट आहे, अशी मुक्ताफळंही वरुण गांधी यांनी उधळली होती. प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वरुण गांधींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्याच काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. या टीकेचा समाचारही शिवसेनाप्रमुखांनी 'वरुण खरं बोलला, आम्हाला हा गांधी चालेल' या लेखात घेतला आहे. तसंच पक्षानं आपल्या एका नेत्याला असं वार्‍यावर सोडणं योग्य नसल्याचा टोला शिवसेनाप्रमुखांनी भाजपला लगावला आहे. तर सध्या सुरू असलेल्या पक्षांतर्गत वादांची आठवण करून देत वरुण गांधींना आधार देण्याचा सल्लाही त्यांनी भाजपला दिलाय. वरुण गांधी म्हणजे संजय गांधींचा पुनर्जन्म असल्याचंही या अग्रलेखात म्हटलं आहे. मतांसाठी विशिष्ट धर्माच्या लोकांचं लांगुलचालन करणार्‍या काँग्रेसला वरुण गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही असा टोलाही शिवसेनाप्रमुखांनी या अग्रलेखात लगावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2009 05:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2009 05:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close