S M L

जसवंत सिंग उद्या भरणार बारमेरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज

Samruddha Bhambure | Updated On: Mar 23, 2014 06:15 PM IST

Image img_96982_del_1506_jaswant_pkg_240x180.jpg23 मार्च : बारमेरमधून उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह भाजपचा राजीनामा देण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अपक्ष म्हणून अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.   त्यामुळे भाजपमध्ये ज्येष्ठ नेते विरूद्ध मधल्या फळीतले नेते असा वाद उफाळून आलेला स्पष्ट झाला आहे.

नाराज जसवंत सिंह यांना दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची नाही. एवढंच नाही तर दुसऱ्या कोणत्याही जागेसाठी मला एडजस्ट करायला मी एखादं फर्निचर नाही अशी स्पष्ट प्रतिक्रीयाही त्यांनी दिली.  त्यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी बारमेर लोकसभा मतदारसंघातल्या सर्व 8 आमदारांना जयपूरला बोलावलं आहे. जसवंत सिंह यांचा मुलगा, आमदार मानवेंद्र सिंह यांचाही या 8 आमदारांमध्ये समावेश आहे. संध्याकाळी 8 आमदारांची बैठक होणार आहे.

दरम्यान, तूर्तास भाजप सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचंदेखील त्यांनी म्हटले आहे. तरीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांनी तयारीही दाखवली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी काल आपण वैयक्तिकरित्या भाजप पक्षनेतृत्वाच्या या निर्णयावर समाधानी नसल्याचे म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2014 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close