S M L

काँग्रेसच्या 48 उमेदवारांची यादी तयार - विलासराव देशमुख

18 मार्च काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही.पण आता काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी तयार असल्याचं, विलासराव देशमुख यांनी आयबीएन - लोकमतशी बोलताना सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. त्याविषयी विलासराव म्हणाले, " 2004 च्या 27 - 21 च्या फॉर्म्युल्यामध्ये बदल झाला नसता तर आतापर्यंत दोन्ही पक्ष प्रचारालाही लागले असते. राष्ट्रवादी काँग्रेस ठराविक जागांसाठी अडून बसला आहे. त्याला आम्ही काय करणार ? " काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी तयार असून दुसरीकडे काँग्रेसची राष्ट्रवादीशी बोलणी चालू आहेत. काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल बोलताना विलासराव म्हणाले, " ऐन वेळेला राष्ट्रवादीचा उमेदवार मागे फिरला तर आयत्या वेळेला आणायचा कुठून म्हणून आम्ही 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आमची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे. " सत्तेवर असणारे मवाळ विलासराव जागावाटपाच्या मुद्द्यावर कमालीचे आक्रमक झाले आहेत. " योग्य उमेदवाराला तिकीट मिळण्यासाठी हा आक्रमकपणा करावा लागतो, " असं विलासराव सांगितलंय. विलासरावांनी उस्मानाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. जर हाय कमांडचा आदेश आला तरच निवडणूक लढवणार असल्याचंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2009 11:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2009 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close