S M L

शोध बाळाचा : अर्भक चोरी प्रकरणी मुंबई पोलिसांना अपयश

18 मार्च, मुंबई अलका धुपकर 76 दिवसांनंतरही मोहन आणि मोहिनी नेरूरकर यांच्या बाळाचा शोध घेण्यास मुंबई पोलीस अपयशी ठरले आहेत. आपलं बाळ मिळत नाही म्हणून त्यांनी बाळाच्या शोधासाठी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या पहिल्या टप्प्याचा निकाल आज लागला आहे. सायन हॉस्पिटल अर्भक चोरी प्रकरणी, मुंबई महानगरपालिका पाच लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे ही रक्कम फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवली जाणार. पाच लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दरमहा नेरुरकर परिवाराला देण्यात यावं असे आदेश न्यायालयानं दिलेत. एका आठवड्यात बिएमसीनं पाच लाख रुपये द्यावेत असे आदेश देण्यात आलेत.या केसची पुढची सुनावणी 6 एप्रिलला होणारेय. सायन हॉस्पिटलमधून एक जानेवारीला चोरीला गेलेल्या बाळाचे आई वडील मोहन आणि मोहिनी नेरुरकर यांनी बाळाच्या शोधासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका आधी दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीत नेरुरकर यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी कमीत कमी दहा लाख रुपये देण्याचा आदेश न्या. बिलाल नाझकी आणि न्या. आर. एन. जोशी यांनी दिले होते. परंतु, ही नुकसान भरपाई देणं शक्य नसल्याची माहिती बीएमसीच्या वकिलांनी कोर्टापुढे दिली होती. त्यावर बीएमसी आयुक्तांकडून तशा प्रकारचं लेखी प्रतिज्ञापत्र मागवलं होतं. आज बीएमसी हे प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर सादर केलं गेलं. सायन हॉस्पिटल अर्भक चोरीप्रकरणी,बीएमसीनं आपली बाजू मांडली आहे. दरम्यान, घणसोली मधल्या इंदू सिंग यांचं सहा महिन्यांपूर्वी हरवलेलं बाळ रबाळे पोलिसांनी बिहारमधून शोधून काढलं आहे. 40 हजार रुपये घेउन बाळाची चोरी झाल्याचं उघड झालं आहे. तसा आपल्या बाळाचा शोध मुंबई पोलीस घेतील अशी आशा नेरुरकर यांना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2009 02:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2009 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close