S M L

जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात १ ठार, ३ जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 28, 2014 02:35 PM IST

जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात १ ठार, ३ जखमी

terrorist228 मार्च :  जम्मू आणि काश्मीरमधल्या कथुआ इथे आज पहाटेपासून दहशतवादी हल्ला सुरू झाल्याचे माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

लष्करी गणवेषात आलेल्या 4 दहशतवाद्यांनी एक बोलेरो गाडी थांबवून गोळीबार सुरु केला. त्यानंतर त्या गाडीत बसून पळ काढला.

आता कथुआतल्या जंगलोत परिसरात लष्कराच्या एका कॅंपवर त्यांनी हल्ला केला आहे आणि तिथल्या एका कॉलेजजवळ दहशतवादी व सुरक्षा यंत्रणांमध्ये गोळीबार सुरु आहे.

सुरक्षा यंत्रणा या गाडीचा शोध घेतायत तर जखमींना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कथुआ परिसर भारत-पाकिस्तान सीमेवर आहे. पहाटे झालेल्या पहिल्या हल्ल्यानंतर बोलेरो गाडीतून पळालेल्या दहशतवाद्यांनीच दुसरा हल्ला केला असल्याचे समजते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2014 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close