S M L

जसवंतसिंह सहा वर्षांसाठी निलंबित

Samruddha Bhambure | Updated On: Mar 30, 2014 12:52 PM IST

Image img_169962_jaswantsing_240x180.jpg30 मार्च :  बारमेर मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांना शनिवारी रात्री पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबीत केले.

पक्षानं तिकिट नाकारल्यानंतर जसवंत सिंह यांनी बंडाचा झेंडा फडकावत बारमेरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. तोपर्यंत भाजपच्या नेतृत्वानं वाट पाहिली. मात्र, अर्ज माघारी घेण्याची विनंती करूनही जसवंतसिंह निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पक्षाने ही कारवाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2014 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close