S M L

विरोधकांच्या फक्त मोठ्या गप्पा - सोनिया गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 30, 2014 08:14 PM IST

विरोधकांच्या फक्त मोठ्या गप्पा - सोनिया गांधी

sonia gandhi30 मार्च :  भाजपहा 'मोठ्या गप्पा' मारणारा पक्ष असल्याची टीका कॉंग्रेस अध्या सोनिया गांधी यांनी आज (रविवार) केली. कॉंग्रेस पक्षाने या देशातील गंगा-यमुना संस्कृती अधिक दृढ केल्याचा दावा करत भाजप फक्त द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजपसारख्या विभाजन करणार्‍या शक्तींना पराभूत करण्याचं आवाहन त्यांनी या सभेत केलं.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आसाममधील लखीमपूर या मतदारसंघात झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.

'भाजप हा देशाभरामध्ये मोठ्या गप्पा मारत प्रचार करत आहे. मात्र केंद्रात सत्ता असताना त्यांच्या पक्षाने काय केले? बोलणे व कृती करणे यांमध्ये मोठा फरक आहे. आम्ही खोटी वचने देत नाही. जे आश्‍वासन आम्ही देतो, ते पूर्ण करतो,' असा टोला ही सोनिया गांधी यांनी लगावला.

तसंच या सभेत त्यांनी यूपीएच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा पाढा वाचला. यूपीए सरकारनं आदिवासींच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी कायदा आणला, माहितीचा अधिकारही यूपीएनं आणला, असं म्हणत, 2009 च्या जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली असा दावाही त्यांनी या सभेत केला.

सोनिया गांधींची नवी दिल्लीत सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसनं गेली दहा वर्ष काय काम केलं त्याचा पाढा तर वाचलाच. पण मोदी आणि आम आदमी पक्षावर टीकाही केली. काही महिन्यांपूर्वीच दिल्लीत एक पक्ष मैदान सोडून पळून गेला, अशी अप्रत्यक्ष टीका सोनियांनी आपवर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2014 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close