S M L

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांना पद्मविभूषण प्रदान

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2014 05:14 PM IST

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांना पद्मविभूषण प्रदान

padam_raghunath mashelakar31 मार्च : दिल्लीत राष्ट्रपती भवनात देशातील प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांचा वितरणाचा शानदार सोहळा पार पडला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 12 पद्मभूषण आणि 53 पद्मश्री पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.

तर अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता कमल हासन यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह पंतप्रधान मनमोहन सिंह, गृहमंत्री सुशीलकुमाप शिंदे, कृषीमंत्री शरद पवार तसंच इतर महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकरांना पद्मविभूषण

रसायनशास्त्रात केलेल्या अतुलनिय कामगिरी करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. माशेलकर यांनी रसायनशास्त्र विषयात केलेल्या बहुमोल कामगिरीची दखल सरकारने घेतलीय.

तसंच माशेलकर यांनी हळद आणि इतर भारतीय पेटंट्ससाठी लढून तो लढा यशस्वी करुन दाखवला होता. त्यामुळे जगात भारतीय वस्तूंची मक्तेदारी कायम राहिली. या लढाईत डॉ. माशेलकर यांची महत्त्वाची भूमिका होती. डॉ. माशेलकर यांनी मुंबईत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. आणि विज्ञान क्षेत्रात भारताला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे योगदान

 • - रसायनसास्त्रातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ
 • - मुंबईमध्ये प्रतिकूल परिस्थिती पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं
 • - भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञानविषयक धोरणांना दिशा देण्यात मोलाचं योगदान
 • - हळद, कडुलिंब, बासमती तांदूळ यांचे पेटंट्स भारताला मिळवून दिली
 • - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला (NCL) आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं
 • - सेंटर फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR)चे महासंचालक होते
 • - पॉलिमर विज्ञान या क्षेत्रात मोठं संशोधन केलं
 • - पद्मश्री, पद्मभूषण आणि 50हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 

पद्मविभूषण पुरस्कारचे मानकरी

 • - डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण
 • - बीकेएस अय्यंगार, योगगुरु, पद्मविभूषण

 पद्मभूषण पुरस्कारचे मानकरी

 • - जस्टीस जे. एस. वर्मा (मरणोत्तर), पद्मभूषण
 • - परवीन सुलताना, शास्त्रीय संगीत गायिका, पद्मभूषण
 • - व्ही. एन. कौल, माजी कॅग, पद्मभूषण
 • - लिएंडर पेस, टेनिसपटू, पद्मभूषण
 • - अनिता देसाई, लेखिका, पद्मभूषण
 • - पुलेला गोपीचंद, बॅडमिंटन कोच, पद्मभूषण

 पद्मश्री पुरस्कारचे मानकरी

 • - नरेंद्र दाभोलकर, संस्थापक-अध्यक्ष, अंनिस (मरणोत्तर), पद्मश्री
 • - युवराज सिंग, क्रिकेटर, पद्मश्री,
 • - दिपिका पल्लीकल, स्क्वॅश प्लेअर, पद्मश्री
 • - परेश रावल, अभिनेता, पद्मश्री
 • - विद्या बालन, अभिनेत्री, पद्मश्री
 • - पं. विजय घाटे, तबलावादक, पद्मश्री
 • - संतोष सिवन, सिनेमॅटोग्राफर, पद्मश्री
 • - सुदर्शन पटनायक, वाळूशिल्पकार, पद्मश्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2014 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close