S M L

पंतप्रधानांनी केली वरुण गांधी आणि भाजपवर टीका

24 मार्च, नवी दिल्ली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपवर टीका केली आहे. ' भाजप हा देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. कारण ते देशाला जातीच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करतायत. याचं ताज उदाहरण म्हणजे वरुण गांधी , ' असंही पंतप्रधान मनमोहन सिंग आगामी निवडणुकीसाठीचा जाहिरनामा प्रिसद्ध करताना म्हणाले. देशात सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्ष वातावरण कायम रहावं यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असं वचन जाहिरनाम्यातून देताना काँग्रेसनं भाजप आणि वरुण गांधी यांच्यावर ताशेरे ओढले. बाबरी मशीद पाडणं हे लालकृष्ण अडवाणी यांचं एकमेव कर्तृत्व आहे. अशा माणसाला देशाचं पंतप्रधानपद देणारा भाजप हा देश तोडायला निघाला आहे. आपल्या प्रक्षोभक बडबडीतून दोषी ठरलेल्या वरुण गांधींना पिलभीत मतदारसंघातून भाजपनं तिकीट देणं ही दुदैर्वी बाब आहे, अशी तिखट टीका ही काँग्रेसनं भाजपवर केली आहे. यावेळी काँग्रेसनं तिस-या आघाडीचाही चांगलाच समाचार घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2009 11:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2009 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close