S M L

वरुण गांधी प्रकरणी एनडीएमध्ये फूट पडण्याची चिन्हं

25 मार्चभाजपचे युवा नेता वरुण गांधी यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणावरुन एनडीएमध्ये फूट पडण्याची चिन्हं आहेत. वरुण गांधीवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी केली आहे. ' राजकारणी आणि या देशाचा नागरीक म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे कि वरुण गांधी यांच्यावर होणारी कारवाई टाळता येणार नाही ' असंही ते बिहारमध्ये बोलताना म्हणाले. पिलीभीत मतदारसंघात 6 मार्चला वरुण गांधीनी आक्षेपार्ह भाषण केल्याचं निवडणूक आयोगाला आढळलं होतं. सुरुवातीला भाजपने टीका केली पण नंतर वरुण गांधींना संरक्षण देत त्यांच्या वक्तव्यांचं समर्थनही केलं होतं. त्यांनतर भाजपने निवडणूक आयोगावरच पक्षपातीपणाचा आरोप केला. पिलीभीत मध्ये दाखल करण्यात आलेला FIR रद्द करावा यासाठी वरुण यांनी दाखल केलेली याचिकाही बुधवारीअलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली. त्यानंतरही भाजपने वरुण गांधीना पाठींबा दिलाय. भाजपचे प्रवक्ते बलवीर पुंज यांनी आज जाहीरपणे निवडणूक आयोगावर टीका केली. संयुक्त जनता दल या एनडीएच्या मित्र पक्षाने वरुण गांधींवर उघडपणे टीका केल्याने भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2009 04:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2009 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close