S M L

अवघ्या 60 कोटींमध्ये 'INS विक्रांत'चा लिलाव

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2014 12:55 PM IST

अवघ्या 60 कोटींमध्ये 'INS विक्रांत'चा लिलाव

ins vikrant09 एप्रिल :  भारतीय नौदलाची एकेकाळी शान आणि 1971 च्या युद्धात दैदिप्यमान अशी कामगिरी बजावणार्‍या INS विक्रांतचा काल अखेर 60 कोटी रुपयात लिलाव करण्यात आला आहे. 'विक्रांत'च्या लिलावाची प्रक्रिया मागील आठवड्यात पूर्ण झाली. आयबी कमर्शिअल लि. या कंपनीने 'विक्रांत' 60 कोटी रुपयांना विकत घेतली. ही युद्धनौका लवकरच संबंधितांच्या ताब्यात दिली जाईल, असं नौदलाच्या सूत्रांनी सांगितलं आहे .

विक्रांतनं 1971 च्या युद्धात निर्णायक भूमिका बजावली होती. 4 मार्च 1961 ला विक्रांतचा नौदलामध्ये दाखल झाली होता. जानेवारी 1997 मध्ये विक्रांत युद्धनौका सेवेतून निवृत्त झाली होती. निवृत्त झाल्यानंतर मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर विक्रांतचं म्युझियम केलं होतं. विक्रांतची सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकार आणि नौदलाकडे होती. विक्रांतचा संग्रहालय म्हणून सांभाळ करण्यात राज्य सरकार आणि नौदल अपयशी ठरल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

विक्रांतच्या संग्रलयासाठी राज्य सरकारने सुरुवातीला 5 कोटींचा निधी उपलब्ध केला होता. दोन वर्षांपूर्वी विक्रांतच्या सांभळण्यासाठी एमएमआरडीएच्या अंतर्गत एक योजना करण्यात आली होती. एमएमआरडीएने विक्रांतच्या देखभालीसाठी 500 कोटींचा खर्च सांगितला होता. मात्र राज्य सरकारने सरळ हातवर करून 500 कोटींचा खर्च देण्यास नकार दिला. यासाठी निविदा मागवण्यात आल्यात. पण यासाठी सरकारने योग्य तो पाठपुरावा केला नाही . त्यामुळे सरकारच्या करंटेपणामुळे विक्रांतचा लिलाव करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2014 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close