S M L

शक्तीप्रदर्शन करत नरेंद्र मोदींनी भरला उमेदवारी अर्ज

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2014 03:58 PM IST

modi road shoe09 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातून आज  (बुधवारी) शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  चहावाल्यांचा प्रतिनिधी म्हणून  चहावाल्यालाच मोदींच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करण्याची संधी मोदींनी दिली.

नरेंद्र मोदी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मोदींनी आज बडोदा मतदार संघातून जिल्हाधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.   त्यापूर्वी भाजप आणि मोदी समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

यंदाच्या निवडणुकीमध्ये मोदी यांनी 'चहा विक्रेता' ही आपली ओळख आवर्जून मांडली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, मोदी यांच्या अर्जावरील स्वाक्षरीसाठी मोदींनी किरण महिदा या चहावाल्याला सूचकाचा मान दिला. त्यांच्या सोबतचं राजघराण्यातल्या शुभांगीदेवी यांनीदेखील  सूचक म्हणून मोदींच्या अर्जावर अनुमोदन केलं आहे. नरेंद्र मोदी गुजरातमधील बडोदा आणि उत्तरप्रदेशमधील वाराणसी मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

अर्ज भरल्यानंतर मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरवात सौराष्ट्रापासून झाली. आता मध्य गुजरातमधून निवडणूक लढविण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. गायकवाड सरकारने चालविलेल्या शाळेत माझे शिक्षण झाले. गायकवाड कुटुंबाची सुशासनाची संकल्पना आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. बडोद्याचे नागरिक हा लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा करतील आणि भाजपला विजयी करतील, असा मला विश्‍वास आहे.' असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2014 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close