S M L

'कारगिल'मध्ये हिंदू नव्हे, फक्त मुस्लीम जवानच शहीद -आझम खान

Sachin Salve | Updated On: Apr 9, 2014 11:32 PM IST

'कारगिल'मध्ये हिंदू नव्हे, फक्त मुस्लीम जवानच शहीद -आझम खान

azam_khan_63009 एप्रिल : उत्तर प्रदेशात धर्माचं राजकारण होणं काही नवं नाही. मुझफ्फरनगरमध्ये अमित शाह यांनी हिंदू धर्माचं नाव घेतल्याची घटना ताजी असतानाच. आता समाजवादी पार्टीने मुस्लिमांना गळ घातली आहे.

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी म्हटलंय की, "कारगिल युद्धात फक्त मुस्लिम जवान शहीद झाले होते आणि एकही हिंदू सैनिकाने प्राण दिले नव्हते." भाजपने आझम खान यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात लक्ष घालू आणि चौकशी करू, असं निवडणूक आयोगने म्हटलं आहे. दरम्यान, आझम खान यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. मुस्लिम जवानांना त्यांचं श्रेय मिळायलाच हवं, असं त्यांनी पुन्हा म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2014 09:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close