S M L

आयपीएलच्या नव्या वेळापत्रकामुळे खेळाडूंची कोंडी

28 मार्च आयपीएलचं नवं वेळापत्रक आखताना खेळाडूंच्या विश्रांतीचा विचारच केलेला नाहीये. हे नवं वेळापत्रक भारतीय खेळाडूंनाच त्रासदायक ठरणार असचं दिसतं आहे. कारण आयपीएलच्या बीझी शेड्युल्डमुळे खेळाडूंना पाच महिन्याहून अधिक काळ घराबाहेर रहावं लागणार आहे. यामुळे खेळाडू काहीसे नाराज आहेत. आयपीएल स्पर्धा आता जवळपास निश्चित झाली आहे. स्पर्धेचं ठिकाण परदेशात दक्षिण आफ्रिका असणार आहे. पण बीसीसीआयनं हे जाहीर करून आपल्याच खेळाडूंची कोंडी केली आहे. कारण बीसीसीआयच्या निर्णयामुळे खेळाडूंना जवळपास दीडशे दिवस देशाबाहेर रहावं लागणार आहे. भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, गौतम गंभीर या क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळणार्‍या खेळाडूंना तर मोठा फटका बसणार आहे. आयपीएल स्पर्धा परदेशात खेळवण्यावर भारतीय क्रिकेट टीममधले खेळाडूही फारसे खुष नाहीत. शिवाय परदेशातल्या स्पवर्धेमुळे देशी प्रेक्षकांच्या पाठिंब्यालाही खेळाडूंना मुकावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2009 05:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2009 05:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close