S M L

वरुण गांधींची तुरुंगात रवानगी

28 मार्च, पिलीभीत पिलीभीतमध्ये स्वत:ला अटक करवून घेण्यासाठी आलेले भाजपचे युवा उमेदवार वरुण गांधी यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. उत्तरप्रदेशातल्या पिलीभीतमध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य करणा-या वरुणच्या गांधीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पिलीभीत जिल्हाधिका-यांनी कलम 153 - अ, 123 - अ आणि 123 - ब या कलमांखाली अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यादरम्यान आपण असं वक्तव्य केलंच नाही, असा पवित्रा घेणा-या वरुण गांधींनी पिलीभीतमध्ये पोलिसांच्या स्वाधीन होणार, अशी आज घोषणा केली होती. त्यानुसार वरुण आले. त्यांना अटक करण्यात आली. त्यावरची पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे. पिलीभीत न्यायालयात स्वत:ला न्यायव्यवस्थेच्या स्वाधीन करण्यास आलेल्या वरुण गांधींनी आयबीएन- लोकमतशी बोलताना सांगितलं, " मी माझ्या तत्त्व आणि भूमिकेवर ठाम आहे. मला अडकवण्यासाठी विरोधकांनी राजकीय कट रचला आहे. पण मी आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणारच. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. वेळ पडली तर मी तुरुंगातही जाईन. तुरुंगात जाणं हे मला कमीपणाचं वाटत नाही आणि मी घाबरतही नाही." इंडियन पिनल कोडच्या 153 - (अ) या कलमान्वये त्यांच्या आत्मसमर्पणाचा अर्ज पिलभीतचे मुख्य न्याय दंडाधिका-यांनी न्यायालयात मान्य केला आहे.आज सकाळी 11 वाजता वरुण गांधी पिलीभीतमध्ये पोहोचले होते. आपल्या नेत्याला अटक होणार म्हणून पिलीभीतमधले भाजपचे कार्यकर्ते भडकले होते. त्यांनी दंगा करण्यास सुरुवातही केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2009 08:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2009 08:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close