S M L

मोदींवर टीका करण्यासाठी काँग्रेसच्या साईटवर अटलबिहारी वाजपेयी!

Samruddha Bhambure | Updated On: Apr 11, 2014 03:52 PM IST

मोदींवर टीका करण्यासाठी काँग्रेसच्या साईटवर अटलबिहारी वाजपेयी!

congress vajpai11 एप्रिल :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणी टीका करण्यासाठी कॉंग्रेसने आता माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा आधार घेतला आहे.

गुजरात जातीय दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'राजधर्माचे पालन करायला हवे' या वक्तव्याची 'आठवण' करून देण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर वाजपेयी यांचे फोटो टाकल्यामुळे आता केले चर्चेला उधाण आलं आहे.  मोदींवर टीका करण्यासाठी वाजपेयींचा फोटो वापरण्यात आला आहे.

'दंगलीच्या काळात मोदींनी राजधर्माचा पालन न केल्याचे खंत वाजपेयींना होते असे काँग्रेसचे म्हणणे होते. यावरुन भाजपमधील सर्वोच्च नेता ज्या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी योग्य समजत नव्हते, त्यांच्या हाती तुम्ही आपलं भविष्य कसं देणार असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. भाजपला वाजपेयींचा विसर पडला असला तरी जनता मात्र या नेत्याला विसरणार नाही असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2014 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close