S M L

रासुका विरोधात वरुण करणार अलाहाबाद हायकोर्टात अपील

30 मार्च, पिलीभीत वरुण गांधी त्यांना लावलेल्या रासुका विरोधात अलाहाबाद हायकोर्टात अपील करणार आहेत. पिलीभीत मतदारसंघातल्या प्रचारसभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे युवा उमेदवार वरुण गांधी यांना उत्तरप्रदेश सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत म्हणजे रासुकाखाली अटक करण्यात आली. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणं, परवानगी शिवाय पिलभीतमध्ये येणं आणि कार्यकर्त्यांना भडकवणं या मुद्द्यांवरून वरुण गांधींना रासुका कायदा लावण्यात आला. रासुका कायदा लागू झाल्यानं वरुण यांना जामीन मिळणं मुश्किल होणार आहे. या कायद्याखाली पुढील कारवाई झाली तर वरुण यांना एक वर्ष तुरूंगवास होऊ शकतो. यात जामीनही मिळू शकणार नाही. या निर्णयाविरोधात वरुणचे वकील अलाहाबाद हायकोर्टात अपील करणार आहेत. दरम्यान वरुण गांधी यांना रायबरेली किंवा रामपूरच्या तुरुंगात हलवलं जाण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2009 07:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2009 07:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close