S M L

मोदींच्या 'सिक्रेट लाईफ'वर काँग्रेसचा आक्षेप, आयोगाकडे तक्रार

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2014 07:01 PM IST

मोदींच्या 'सिक्रेट लाईफ'वर काँग्रेसचा आक्षेप, आयोगाकडे तक्रार

346kapil sibal_mulyam_5211 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपणं विवाहित असल्याचं मान्य केलंय पण त्यांच्या या 'सिक्रेट लाईफ'वर काँग्रेसने आक्षेप घेतलाय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.

मोदींनी विवाहित असल्याची माहिती लपवलीय. 2012 पर्यंत मोदींनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलाय. निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आलीय.

नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी प्रतिज्ञापत्रात आपण विवाहित असल्याचं मान्य केलं. 45 वर्षांपुर्वी मोदींचा विवाह जशोदाबेन यांच्याशी झाला. पण मोदींनी यापुर्वी 2001, 2002, 2007 आणि 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरताना विवाहित की अविवाहित हा रकानाच भरला नाही. यावर त्यावेळीही काँग्रेसने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टाने काँग्रेसची याचिका फेटाळून लावली होती. यावेळी मोदींनी विवाहित असल्याचं मान्य केलंय पण माहिती लपवून का ठेवली ? असा सवाल करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2014 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close