S M L

छत्तीसगडमध्ये निवडणूक पथकावर नक्षली हल्ला, 15 ठार

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2014 09:20 PM IST

Image img_232172_naxal345_240x180.jpg12 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. पण दुसरीकडे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून लोकशाहीच्या प्रक्रियेवर हल्ला चढवला आहे. नक्षलवाद्यांनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी हा तिसरा हल्ला केलाय.

छत्तीसगडमध्ये दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी भीषण हल्ला केलाय. या नक्षली हल्ल्यात एकूण 15 जणांचा मृत्यू झालाय. बिजापूरमध्ये निवडणूक पथकाच्या बसवर हल्ला केलाय. या हल्ल्यात मतदान कर्मचारी बस ड्रायव्हर आणि क्लिनरसह 7 जण ठार झाले. तर बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात सीआरपीएफचे पाच जवान ठार झाले.

बिजापूर जिल्ह्यात गुदमा गावाजवळ नक्षलवाद्यांनी मतदान कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या बसला टार्गेट केलं. नक्षलवाद्यांनी रस्त्यामध्ये भुसुरूंग लावून स्फोट घडवून आणला. बिजापूरमध्ये 10 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडल्यानंतर सर्व कर्मचारी परतत होते. काही कर्मचारी पायी निघाले होते तर काही कर्मचार्‍यांनी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ही बस केचुलनार गावाजवळ पोहचली असता नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला. हा स्फोट इतका भीषण होता की, बसचा समोरचा भाग वेगळा झाला. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी बसवर अंदाधूंद गोळीबार केला.

तर सुकमाच्या दर्भा घाटीमध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानाची बस स्फोटाने उडवली यात पाच जवान शहीद झाले. गडचिरोलीमध्ये तिसर्‍या टप्प्यात मतदानच्या दिवशीही नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कालच नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला यात 1 जवान शहीद झाला. त्यानंतर आज नक्षलवाद्यांनी तिसरा हल्ला केलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2014 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close