S M L

रिमोट कंट्रोलच हे सरकार चालवतंय -मोदी

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2014 02:14 PM IST

narendra_modi_hariyana12 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज (शनिवारी) संध्याकाळी पुण्यात सभा झाली. महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचारसभेत मोदींनी संजय बारू यांच्या पुस्तकावरून सोनिया गांधींवर सडकून टीका केली.

रिमोट कंट्रोल सरकार ऐकलं होतं, पण रिमोट कंट्रोलच सरकार चालवतंय, हे पहिल्यांदा ऐकतोय, अशी बोचरी टीका मोदींनी केली. सोनिया गांधी यांनी बारूंच्या गौप्यस्फोटाचं उत्तर द्यावं असं मोदी म्हणाले.

तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीला पुण्यात उमेदवार मिळाला नाही. म्हणून त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागला. ज्यांना पुण्यात चांगला माणूस सापडत नाही, त्यांना पूर्ण देशात चांगला माणूस सापडू शकत नाही अशी टीकाही मोदींनी केली.

दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या सभेनंतर मोदीसुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल काहीतरी बोलतील, अशी शक्यता होती. पण मोदींनी राजबद्दल एक शब्दही काढला नाही. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरही मोदी बरसले. आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत दुसर्‍या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांचं भाषण वाचलं. असं अजून कुठे होऊ शकतं का, असा सवालंही मोदींनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2014 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close