S M L

आपल्याच सरकारमध्ये पंतप्रधान होते 'जायबंद' ?

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2014 04:39 PM IST

आपल्याच सरकारमध्ये पंतप्रधान होते 'जायबंद' ?

parakh coal14 एप्रिल : पंतप्रधान कार्यालयाचे माजी प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांच्या 'द ऍक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकानंतर आता माजी कोळसा सचिव पी.सी.परख यांचं पुस्तक उद्या (मंगळवारी) बाजारात येणार आहे. 'क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर - कोलगेट ऍण्ड अदर ट्रुथ्स' असं या पुस्तकाचं नाव आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्वतःच्याच सरकारमध्ये फारच कमी राजकीय अधिकार असल्याचं परख यांनी या पुस्तकात म्हटलंय.

यामुळे टू-जी आणि कोलगेट घोटाळ्यांमध्ये पंतप्रधानांची प्रतिमा मलिन झाली, असा दावा परख यांनी केलाय. पंतप्रधान हे कोळसा खाणींचं वाटप करण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याच्या बाजूने होते. पण, यूपीए आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांमुळे ते शक्य झाले नाही असं परख यांनी या पुस्तकात नमूद केलंय.

यामुळे निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पी.सी. परख हे कोळसा घोटाळ्यातले आरोपी आहेत. ते डिसेंबर 2005मध्ये कोळसा खात्याचे सचिव या पदावरून निवृत्त झाले.

पुस्तकात परख म्हणतात...

"डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा दिला असता तर देशाला आणखी चांगले पंतप्रधान मिळाले असते का, हे मी सांगू शकत नाही. डॉ. सिंग यांचे मंत्री त्यांचे निर्णय बदलून किंवा त्यांची अंमलबजावणी न करून त्यांना अपमानित करायचे. या सरकारमध्ये त्यांना फार थोडे राजकीय निर्णय घ्यायचे अधिकार होते. त्यांची प्रतिमा जरी सचोटीची असली तरी 2 जी घोटाळा आणि कोळसा घोटाळयामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा गेलाय."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2014 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close