S M L

बारूंनी माझ्या वडिलांचा विश्वासघात केला- पंतप्रधानांच्या मुलीची टीका

Samruddha Bhambure | Updated On: Apr 15, 2014 04:17 PM IST

बारूंनी माझ्या वडिलांचा विश्वासघात केला- पंतप्रधानांच्या मुलीची टीका

15 एप्रिल :  माजी प्रसिध्दी प्रमुख संजय बारु यांनी माझ्या वडिलांचा विश्वासघात केला असून बारुंचे वर्तन म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे असे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची  मुलगी उपिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. संजय बारू यांच्या पुस्तकाबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाकडून प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. पंतप्रधानांच्या सर्वात मोठी मुलगी आणि इतिहासकार उपिंदर सिंग यांनी संजय बारूंवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधानान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर त्यांचे माजी प्रसिध्दी प्रमुख संजय बारु यांनी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर - द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक लिहीले असून यात मनमोहन सिंग दुबळे पंतप्रधान असल्याचे म्हटले होते. यावरुन विरोधकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चहूबाजूंनी कोंडी केली आहे.

या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांच्या बचावासाठी त्यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग या मैदानात उतरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक प्रकाशित केल्याने संजय बारू स्वत:ला पंतप्रधानांचे हितचिंतक म्हणवून घेऊ शकत नाहीत.

दरम्यान, बारुंच्या पुस्तकावर प्रियंका गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझी आई सोनिया गांधी या सुपर पीएम नव्हत्या. मनमोहन सिंगच सुपर पीएम होते असे प्रियंका गांधींनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या उपिंदर सिंग ?

'लेखकानं स्वतःला पूर्ण माहिती असल्याचा आव आणल्यामुळे आम्ही अतिशय संतप्त आहोत. पुस्तक कधी प्रकाशित करायाचं हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा असला तरी, यामागे इतर काही कारणे आहेत, असं मला वाटतं. त्यामागं राजकीय हेतू नाही असं म्हणणं निरर्थक आहे. संजय बारू स्वत:ला पंतप्रधानांचे हितचिंतक म्हणवून घेऊ शकत नाहीत. काही अफवा आणि खातरजमा न केलेली विधानं एकत्र करून ती खरी असल्याचं ते भासवतील असं आम्हाला वाटलं नव्हतं.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2014 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close