S M L

गुजरात दंगलीबाबतच्या प्रश्नाला मोदींची बगल

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2014 05:50 PM IST

modicopy16 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा 2002च्या गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नांना बगल दिली आहे.

टीव्ही9 या न्यूज चॅनलला मोदी यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना दंगलींबद्दल तुम्ही माफी मागायला हवी, अशी टीका काँग्रेसकडून वारंवार होतेय, असा प्रश्न विचारला असताना त्यावर काँग्रेसने आधी स्वत:कडे बघावं, त्यांनी आधी आपल्या पापांबद्दल माफी मागावी, असं मोदींनी म्हटलं आहे.

गुजरात दंगलीबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून मोदींनी माफी मागावी, अशी मागणी होत असलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

त्याचं बरोबर, 'सत्तेत आल्यावर कुणावरही आकस ठेवून काम करणार नाही', असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. सत्तेवर आलात तर सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडरांवर कारवाई करणार का विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. वडरा यांच्यावर हरियाणा आणि राजस्थानात जमिनींच्या गैरव्यवहारांचा आरोप आहे. कवडीमोल किंमतीनं भूखंड खरेदी करून कोट्यवधी रुपये कमवल्याचा आरोप आहे. याविषयी विचारल्यावर "आपल्या सरकारचं मुख्य लक्ष्य हे जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं असेल आणि आम्ही सकारात्मक भावनेनं काम करू. कुणावरीही आकस ठेवणार नाही. इतरांच्या सूडबुद्धीची मी गेली 12 वर्षं किंमत मोजली आहे. मी तसं करणार नाही.", असं मोदींनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

देशभरात मोदी लहर पसरली आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, देशात भाजपची लहर आहे, मोदीची नाही. मोदी हे पक्षापेक्षा मोठे नाहीत, असे ते म्हणाले. त्याचं बरोबर भाजपमध्ये आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांना हव्या असलेल्या जागेवरून निवडणूक लढवू दिली गेली नाही, याबाबत प्रश्न विचारला असता, 'आपण जागांची निवड करत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2014 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close