S M L

भाजपची विचारसरणी विभाजन करणारी -प्रियांका गांधी

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2014 10:53 PM IST

भाजपची विचारसरणी विभाजन करणारी -प्रियांका गांधी

12priyanka_gandhi_16 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची सांगता झाल्यानंतर काँग्रेसने नाही हो म्हणत अखेर प्रियांका गांधी यांना प्रचारात उतरवलंय. सध्या प्रियांका फक्त अमेठी आणि रायबरेलीवर आपलं लक्ष केंद्रीत करत आहेत.

आज (बुधवारी) प्रियांकांनी सोनिया गांधींसाठी रायबरेलीत प्रचार केला. आज सकाळीपासून रोड शो आणि रॅलींचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आक्रमक भूमिका घेत प्रियांकांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली. भाजपची विचारसरणी व्यक्तीकेंद्रीत आणि विभाजन करणारी आहे अशी टीका प्रियांका गांधींनी केली.

विशेष म्हणजे रायबरेलीत सोनियांना इतक्या अडचणी नाहीत. पण राहुल गांधींसाठी अमेठीत यावेळी काही अडचणी निर्माण होऊ शकता. याचं कारण म्हणजे भाजपनं अभिनेत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी तर आपनं कुमार विश्वास यांना रिंगणात उतरवलंय. या दोघांचा प्रचारही जोरात सुरू आहे त्यामुळेच काँग्रेसने नाही हो म्हणत प्रियांकांना अखेर प्रचारात उतरवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2014 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close