S M L

बँकेतून रोख रक्कम काढण्यासाठी आता 'नो टॅक्स'

2 एप्रिल बँकेच्या ग्राहकांसाठी एटीएमचे चार्जेस माफ झाल्यानंतर आज ग्राहकांसाठी आणखी एक खुषखबर आहे. आता बँकेतून रोख रक्कम काढल्यावर त्यावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. सरकारनं आता बँकिंग कॅश, ट्रॅन्झॅक्शन टॅक्सदेखील बंद केलाय. हा टॅक्स 2005 सालापासून लागू करण्यात आला होता. ज्यामुळे नॉन सेव्हिंग अकाउंटमधून एका दिवसात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यावर 0.1 टक्के टॅक्स भरावा लागत होता. पण आता हा टॅक्स भरावा लागणार नाही. कंपन्यांसाठी एका दिवसात एक लाखापेक्षा जास्त रकमेच्या विड्रॉवलवर टॅक्स लागत होता. देशातल्या प्रमुख सरकारी बँकर्स आणि उद्योगपतींसमवेत आज सरकारची बैठक झाली. बैठकीत महागाई कमी होऊनही मंदीच्या परिणामांचा प्रभाव बँकांच्या कर्ज देण्याच्या प्रमाणावर जाणवतोय तसंच कर्जाची उपलब्धता आणि व्याजदर अशा काही प्रमुख विषयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीमधे कॅबिनेट सचिव के एम चंद्रशेखर, एसबीआय, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि इतर काही बँकांचे प्रमुखही उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2009 01:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2009 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close