S M L

राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण

3 एप्रिलराष्ट्रवादी काँग्रेसचा जाहिरनामा आज मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला. त्यात मराठा समाजाबरोबच मुस्लिमांनाही आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसंच सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देणार असल्याचंही जाहिरनाम्यात नमूद करण्यात आलंय. यावेळी तिसर्‍या आघाडीबाबत पवारांना विचारलं असता 'मला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा आणि मुस्लिमांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचं आश्वासन राष्ट्रवादीनं त्यांच्या जाहिरनाम्यात दिलंय. तसंच ग्रामीण भागातल्या दुर्बल घटकांचा विकास करण्याची ग्वाहीही त्यांच्या जाहिरनाम्यात देण्यात आलीय. हे सगळे मुद्दे मांडत असताना पवारांनी नवीन राज्य निर्मितीचा विचारही बोलून दाखवला. सत्तेत आल्यानंतर पाच वर्षांच्या आत झोपडपट्टीत राहणार्‍यांना पक्की घरं पुरवण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलंय. खाजगी क्षेत्रात एससी, एसटी लोकांसाठी विधेयक आणून नोकर्‍यांत आरक्षण देणार असल्याचंही राष्ट्रवादीनं म्हटलंय. एनडीएला फायदा होईल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही अशी ग्वाही देतानाच आम्ही युपीएसोबत असल्याचा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला.राष्ट्रवादीचा जाहीरनामा...मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देणारआर्थिक निकषावर आरक्षण देणारसामाजिक, शैक्षणिक आरक्षण देणारदबलेल्या समाजघटकांना आरोग्यसेवाग्रामीण दुर्बल घटकांचा विकास करणारदेशविकासाला प्राधान्य देणारनवीन राज्यनिर्मितीचा विचारमहिलांना संसदेत, विधिमंडळात 33% आरक्षणाची गरजऍट्रोसिटी, हुंडा प्रकरणाचा छडा लावणारप्रत्येक गावात शिक्षणाची सोय करणारदारिद्र्य निर्मूलन करणारझोपडपट्टीत राहणार्‍यांना पक्की घरं5 वर्षांच्या आत घरं पुरवली जातीलअनुसूचित जातीसाठी स्पेशल प्लॅनस्पेशल कॉम्पोनंट प्लॅन-पवारट्रायबल सबप्लॅनसाठी भरपूर निधीखाजगी क्षेत्रात एससी, एसटी लोकांना विधेयक आणून नोकर्‍यांत आरक्षण देणार

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2009 02:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2009 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close