S M L

भाजपच्या गिरीराज सिंह यांना जामीन मंजूर

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2014 03:05 PM IST

भाजपच्या गिरीराज सिंह यांना जामीन मंजूर

giriiraj singh25 एप्रिल :  निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान करणार्‍या भाजपच्या गिरीराज सिंग यांना पाटणा कोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र, त्यांच्याविरोधात झारखंडमधल्या कोर्टानं काढलेलं अटक वॉरंट कायम आहे.

सिंह यांच्याविरोधात 21 एप्रिलला FIR दाखल करण्यात आला होता. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्‍यांनी पाकिस्तानात जावं असं वक्तव्य गिरीराज सिंह यांनी प्रचारादरम्यान केलं होतं. यानंतर सर्व स्तराच्या राजकीय पक्षांकडून सिंह यांच्यावर टीका होत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2014 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close