S M L

मतदारयाद्यांतल्या घोळाबाबत निवडणूक आयुक्तांनी मागितली माफी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2014 04:00 PM IST

मतदारयाद्यांतल्या घोळाबाबत निवडणूक आयुक्तांनी मागितली माफी

brahma_1815468f25 एप्रिल : राज्यात सध्या मतदार याद्यांचा घोळ गाजतोय. मतदार याद्यांमधल्या घोळावर खुद्द निवडणुक आयुक्त एच. एस.ब्रम्हा यांनी आज आयबीएन नेटवर्कला एक्सक्लुझिव मुलाखतीत मतदारांची माफी मागितली आहे.

'प्रत्येक भारतीयाला मतदान करता यावे ही आमची जबाबदारी आहे. सगळ्यांची नावं यादीत येतील, त्यांना मतदान करता येईल, ही आमची जबाबदारी होती, अशी कबुली निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी दिली आहे. समन्वयाच्या अभावामुळेच ही नावं गहाळ झाली, पहिल्यांदाच अशी चूक घडली. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही सुधारणा करू, असं ब्रह्मा यांनी म्हटलं आहे. तर ज्या गंभीर त्रुटी राहिल्या त्याचा शोध घेऊन गंभीर कारवाई करण्याची गरज असल्याचं निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी म्हटलं आहे.

तर 'झोपडपट्टीत राहणार्‍यांनी मतदार यादीतल्या घोळाविषयी नाराजी व्यक्त केली तर मी समजू शकतो, पण कॉर्पोरेट्सनी अशी कुरकूर करणं, योग्य नाही, यावेळी नाव वेबसाईटवर उपलब्ध होती त्यामुळे हा त्यांचा निष्काळजीपणा आहे', असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना व्यक्त केलं.

महाराष्ट्रात काल झालेल्या तिसर्‍या टप्प्याच्या मतदानात लाखो मतदारांना मतदान करता आलं नव्हतं. त्याविरुद्ध आता राजकीय पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नव्याने मतदान करणारे तरूण आणि नेहमी मतदान करणारे मतदार दोघांनाही काल आपला मतदानाचा हक्का बजावता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला.

राज्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रकार घडल्यानं त्याची एकूणसंख्या काही लाखांमध्ये जाण्याची शक्यता आहे. वगळण्यात आलेली नावं ही सरकार विरोधातले मतदार असल्यानं हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. तसंच या मतदान करू न शकलेल्या मतदारांना फेरमतदान करता यावं अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची भेट घेऊन तक्रार केली. तसंच याविरोधात ते न्यायालयातही जाणार आहेत.

भाजपनही या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. वकील मोहन जयकर हे मतदार याद्यांमधली नावं गहाळ झाल्याप्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहेत.

महाराष्ट्र निवडणूक आयोगानं एक निवेदन प्रसिद्ध केलंय. निवडणूक आयोगाचं निवेदन

निवडणूक आयोगानं वर्तमानपत्रांमध्ये अनेक जाहिराती देऊन नागरिकांना मतदार याद्यांमध्ये नावं आहेत की नाहीत, ते आधीच ऑनलाईन तपासायला सांगितलं होतं. 20 मेपासून निवडणूक आयोग मतदार याद्या अद्ययावत करेल, तेव्हा वगळलेल्या मतदारांचा त्यामध्ये समावेश केला जाईल.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2014 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close