S M L

काँग्रेसला धक्का, पंतप्रधानांचे भाऊ दलजीत सिंग भाजपमध्ये

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2014 11:10 PM IST

काँग्रेसला धक्का, पंतप्रधानांचे भाऊ दलजीत सिंग भाजपमध्ये

daljeet_singh_BJP25 एप्रिल : देशात मोदींची लाट नाही असं म्हणणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज (शुक्रवारी) भाजपने चांगलाच धक्का दिला. मनमोहन सिंग यांचे धाकटे भाऊ दलजीत सिंग कोहली यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी अमृतसरमध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

मोदी आज अरुण जेटली यांच्या प्रचारसभेत अमृतसरमध्ये होते यासभेतच दलजीत सिंग यांनी मोदींची गळाभेट घेत प्रवेश केला. पंतप्रधानांचे भाऊ दलजीत यांचं भाजपमध्ये स्वागत आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसला चिमट काढला. दलजीत यांच्या प्रवेशामुळे आम्हाला चांगला फायदा होईल आणि पक्ष आणखी मजबूत होईल. भाजपहा रक्तांच्या नात्यांवर विश्वास ठेवणार पक्ष आहे असंही मोदी म्हणाले.

 

दलजीत यांच्या भाजप प्रवेशाने सिंग कुटुंबीय हैरान आहे. याच काय कारण असू शकतं हे दलजीत यांना माहिती आहे. पण आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी ते स्वतंत्र आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2014 11:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close