S M L

नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री प्रदान

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2014 02:50 PM IST

नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री प्रदान

narendra dabholkar26 एप्रिल : दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात आज (शनिवारी) पद्म पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म रत्नांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

तर योगगुरू बी.के.एस अय्यंगार यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार रस्किन बॉण्ड यांना, क्रीडा क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार लिएंडर पेस आणि पद्मश्री पुरस्कार अंजुम चोप्रा यांना प्रदान करण्यात आले. पंडित विजय घाटे आणि परेश रावल यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

पद्म गौरव

  • पद्मविभूषण - बी.के.एस.अय्यंगार
  • पद्मभूषण - रस्किन बॉण्ड (साहित्य)
  • पद्मभूषण - लिएंडर पेस (क्रीडा)
  • पद्मश्री - अंजुम चोप्रा (क्रीडा)
  • पद्मश्री - डॉ.नरेंद्र दाभोलकर (मरणोत्तर)
  • पद्मश्री - पंडित विजय घाटे (कला)
  • पद्मश्री - परेश रावल (कला)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2014 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close