S M L

एफआयआरचा दणका, बाबांनी मागितली माफी

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2014 08:03 PM IST

baba ramdev on 37726 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांनी माफी मागितलीय.

राहुल गांधी दलितांच्या घरी पिकनिकसाठी जातात, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली होती. त्यावरून बराच वाद झाला. या प्रकरणी रामदेव बाबा यांच्या विरोधात विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आलीय. या सर्व घटनेनंतर बाबा रामदेव यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलंय.

आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. दलितांचा किवा राहुल गांधींचा अपमान करण्याचा आपला कधीच उद्देश नव्हता, असं बाबा रामदेवनी म्हटलंय. आणि त्यांनी दलितांचीही माफी मागितलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2014 07:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close