S M L

भाजपचा वडरांवर जोरदार हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Apr 28, 2014 02:12 PM IST

भाजपचा वडरांवर जोरदार हल्ला

231304-231297-vadra28 एप्रिल :  सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडरा यांच्या जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या गाजत आहे. भाजपने पत्रकारपरिषद घेऊन रॉबर्ट वढेरा यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला. भाजपने रॉबर्ट वडरा यांचा एक व्हिडियो दाखवला आणि हा ‘दामादगेट घोटाळा’ असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. वडरा यांनी हरियाणा आणि राजस्थानात जमीन घोटाळ्याचा केल्याचं भाजपचं म्हणणं आहे. वडरा यांनी नियम डावलून जमिनी लाटल्या पण, काँग्रेस त्यांचा बचाव करत असल्याचंही भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद यांनी रॉबर्ट वढेरा विकास मॉडेलवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'आता पर्यंत मी काँग्रेस नेत्यांना विचारत आलो आहे. आता मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना विचारु इच्छितो की 'रॉबर्ट वढेरा विकास मॉडेल' नेमके काय आहे?'

दरम्यान , भाजपने रॉबर्ट वढेरांविरोधात व्हिडिओ आणि पुस्तिका प्रकाशित केल्यानंतर प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'भाजप भाजपची अवस्था घाबरून पळत सुटलेल्या उंदराप्रमाणे झाली आहे. मला माहित होते, की निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात हे असे आरोप पुन्हा करतील. त्यात काही नाविन्य नाही.  त्यांनी कितीही टीका केली तरी त्याला मी घाबरत नाही', असं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close