S M L

मोदींसारख्या कल्याणकारी हुकूमशहाची देशाला गरज -रावल

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2014 05:10 PM IST

मोदींसारख्या कल्याणकारी हुकूमशहाची देशाला गरज -रावल

paresh rawal_modi28 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हुकूमशहा आहेत अशी टीका विरोधक करत आहेत पण आता त्यांच्याच पक्षाचे भाजप उमेदवार परेश रावल यांनीच घरचा अहेर दिलाय आहे. मोदींसारख्या कल्याणकारी हुकूमशहाची आपल्या देशाला गरज आहे, असं खळबळजनक वक्तव्य भाजपचेच उमेदवार आणि अभिनेते परेश रावल यांनी केलंय. 'डेक्कन क्रॉनिकल' या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिलीय.

या मुलाखतीत रावल म्हणतात की, मोदींसारख्या उदारमतवादी हुकूमशहाची आपल्या देशाला गरज आहे.उदारमतवाद आणि हुकूमशाही हे उत्तम समीकरण ठरेल. असा हुकुमशहा जो लोकांबद्दल विचार करतो, त्यांच्या भल्यासाठी काम करतो, त्यांच्या समस्यांना समजून घेतो आणि मोदी असे आहेत. ते लोकांना विश्वासात घेतात पण ते कामही पटकन पूर्ण करतात. ते म्हणतात 'भय्या ये करो'. पण काहीजण फक्त काय होत नाहीए हेच दाखवतात, गुजरातमध्ये काय- काय होतंय ते सांगत नाहीत असा सवाल रावल यांनी उपस्थित केला.

तसंच मोदींना पूर्ण बहुमत मिळालं तर मोदी जादू करु शकतील असं तुम्हांला वाटतं का? हा प्रश्न त्यांना विचारला असता रावल म्हणाले, ''मोदींमध्ये निश्चितच दम आहे, आणि मोदींचं बहुमताचं सरकार यायलाच हवं, नाहीतर मग काही लोक आणखी बोंबा मारतील की 'मोदी हुकूमशहा आहेत'. मी तर म्हणतो की आपल्याला उदारमतवादी हुकूमशहाची गरजच आहे. अहमदाबाद पूर्व मतदार संघातून परेश रावल भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचाराला अधिकच रंग आलाय. परेश रावल यांच्या प्रचारासाठी बॉलिवूचे अनेक अभिनेते अहमदाबादमध्ये येत आहेत.

रावल म्हणतात,

''मोदींसारख्या कल्याणकारी हुकूमशहाची आपल्या देशाला गरज आहे. हे उत्तम समीकरण ठरेल. असा कल्याणकारी हुकुमशहा ज्याचा हेतू चांगला आहे, जो लोकांचा, त्यांच्या भल्याचा विचार करतो, जो त्यांना समजून घेतो.आणि मोदी असे आहेत. ते लोकांना विश्वासात घेतात आणि कामही पटकन पूर्ण करतात.''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close