S M L

सातव्या टप्प्याचा प्रचार संपला, बुधवारी मतदान

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2014 09:06 PM IST

7856voting_mumbai_new28 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्याचा प्रचार आज (सोमवारी) संपला. 9 राज्यांमधल्या 89 जागांसाठी 30 एप्रिलला मतदान होतंय. सातव्या टप्प्याचं हे मतदानात गुजरातचाही समावेश आहे.

गुजरातमधल्या 26, आंध्र प्रदेशातल्या 17, उत्तर प्रदेशातल्या 14, पंजाबमधल्या 13, पश्चिम बंगालमधल्या 9, बिहारमधल्या 7 तर दादरा नगर हवेली दमण दीव आणि जम्मू काश्मिरमधल्या एका जागेसाठी मतदान होणार आहे.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे गुजरातमधून बडोद्यातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वांचं लक्ष्य लागून आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातल्या लढतींकडेही लक्ष असणार आहे. तेलंगणाचा स्वतंत्र राज्य निर्मितीचा निर्णय झाल्यानंतर इथे पहिल्यांदाच मतदान होतंय.

सातव्या टप्प्याचं मतदान- एकूण जागा- 89

गुजरात- 26

आंध्र प्रदेश- 17

उत्तर प्रदेश- 14

पंजाब- 13

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 09:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close