S M L

बाबा रामदेव यांना आज अटक होण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Apr 29, 2014 03:40 PM IST

बाबा रामदेव यांना आज अटक होण्याची शक्यता

THSHK_BABA_RAMDEV_1265991f29 एप्रिल : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे बाबा रामदेव त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सोमवारी जालन्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय.

त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्येही तीन ठिकाणी रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय. गोरखपूर, आग्रा आणि पाटणा याठिकाणी एफआयआर दाखल केली. त्यामुळे रामदेव यांना आज अटकही होण्याची शक्यता आहे.

 काही दिवसांपूर्वी 'राहुल हे दलितांच्या घरी हनीमूनसाठी आणि पिकनिकला जातात' अशी टीका रामदेव यांनी  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली होती.

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे बाबा रामदेवांवर यांच्या सभांवर 16 मे पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय लखनौ प्रशासनाने घेतल्यानंतर आता हिमाचल प्रदेश, अमेठीमध्येही त्यांच्या सभांवर बंदी घालण्यात आली आहे.

नागपूरमध्ये रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खोब्रागडे यांच्या तक्रारीवरुन पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुसुचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, कलम 3 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा रामदेवना अटक करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनांचा आज बेळगाव बंद पुकारण्यात आला आहे. कर्नाटकातील 12 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान होणार असून मतदानावर या बंदाचा परीणाम होण्याची शक्यात वर्तवाण्यात येत आहे.

दरम्यान, बाबा रामदेव यांना भाजपचा पाठिंबा आहे. काँग्रेस त्यांची प्रतिमा मलिन करतेय, असं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे बाबा रामदेव यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. काहीवेळा पूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्याचबरोबर काँग्रेसवर त्यांनी टीकाही केली आहे.

काँग्रेस दलितांचा व्होटबँक म्हणून वापर करते. हनिमून हा शब्द मी राजकीय अर्थानं वापरला होता त्यात दलितांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता असं स्पष्ट करत बाबा रामदेव यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग मला योगासनांचा कार्यक्रम घेऊ देत नाहीत असा आरोप केला आहे. माझ्याविरुद्धचं हे कारस्थान होत असून मी दलितांच्या विरुद्ध असल्याचा गैरप्रचार करत आहेत. आमच्या पतंजलीपीठाद्वारे दलितांना मान देण्यासाठी काम केलं असल्याचंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले आहे.  उत्तराखंडमधलं काँग्रेस सरकार माझ्याशी सूडबुद्धीनं वागत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. काँग्रेसनं दलितांना फक्त व्होट बँक म्हणून वापरल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close