S M L

मोदींना बघून कसाई सुद्धा लाजेल,लालूप्रसाद यादवांची विखारी टीका

Samruddha Bhambure | Updated On: Apr 29, 2014 03:49 PM IST

lalu new29 एप्रिल :  राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही आता नरेंद्र मोदींवर जोरदार तोफ डागली आहे. 'तृणमूल काँग्रेसनं मोदींना कसाई म्हटलं होतं, पण कसाईसुद्धा मोदींना पाहून लाजेल' अशी विखारी टीकालालू प्रसाद यांनी केली आहे. बिहारमध्ये उद्या होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रीय जनता दलामध्ये वाद पेटला चांगलाचं आहे. असा माणूस देशाचा पंतप्रधान होणार का असा सवालही त्यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शारदा चिट फंड घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी प. बंगालमधल्या श्रीरामपूर इथल्या सभेत बोलताना केला होता. तर मोदींच्या  टीकेला प्रत्युत्तर देत तृणमूल कॉंग्रेस पक्षाने मोदी हे खाटीक असल्याचा असल्याची टीका केली होती. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर या शाब्दिक युद्धला चांगलाचं रंग चढू लागला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close