S M L

वाराणसीत कौमी दलाचा 'हात' काँग्रेससोबत, मोदींना अडथळा

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2014 09:54 PM IST

वाराणसीत कौमी दलाचा 'हात' काँग्रेससोबत, मोदींना अडथळा

46mukhtar_ansari29 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीमध्ये 12 मे रोजी मतदान होणार आहेत. पण इथल्या कौमी एकता दलाने काँग्रेसला पाठिंबा देण्याचं ठरवलंय. वाराणसीत मुख्तार अन्सारींच्या कौमी एकता दलाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय.

मुख्तार अन्सारीनी गेल्या वेळी 1.8 लाख मतं मिळवली होती. मुस्लीम मतांची विभागणी टाळण्यासाठी काँंग्रेसला पाठिंबा दिल्याचं कौमी एकता दलाने सांगितलंय. त्यामुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. तर त्याचा फटका आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनाही बसणार असल्याचं बोललं जातंय.

असं समजलं जात होतं की, मुख्तार अन्सारी मैदानात न उतरल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना समर्थन मिळले. पण काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी ऐनवळी सूत्र हलवली आणि कौमी एकता दलाचा पाठिंबा मिळवला. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केजरीवाल यांनी धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन करू नये असं ट्विट केलं होतं. सध्या तरी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी अन्सारी यांच्या समर्थनाचं स्वागत केलंय.

वाराणसीमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या 2.90 लाख इतकी आहे तर स्थानिक मतदारांची संख्या 1.75 लाख आहे. तर ब्राम्हण समाजाची मतांची संख्या 2 लाख इतकी आहे. तर सर्वसामान्य मतदारांची संख्या 3.50 लाख इतकी आहे. दलित समाजाची मताची संख्या 1.20 लाख आहे. मागील निवडणुकीत मुस्लिम आणि दलितांच्या मतामुळे मुख्तार अन्सारी दुसर्‍या स्थानावर होते. तर भाजपचे उमेदवार मुरली मनोहर जोशी यांच्यामध्ये जवळपास 17 हजार मतांचा फरक होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 08:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close