S M L

जम्मू-काश्मीर वगळता सर्वत्र विक्रमी मतदान

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2014 09:48 PM IST

जम्मू-काश्मीर वगळता सर्वत्र विक्रमी मतदान

930aprilvoting_pbangal30 एप्रिल : लोकसभेच्या सातव्या टप्प्यासाठी 9 राज्यांमध्ये मतदान शांतेत पार पडलं. लोकसभेच्या 89 जागांसाठी हे मतदान झालं असून मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा चांगलं मतदान झालं. गुजरात, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसह दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक विक्रमी 81 टक्के इतकं मतदान झालं.

इथल्या हावडा, हुगळी, सेरामपूर आणि बिरभूममध्ये चांगलं मतदान झालंय. तर नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येही एकूण 62 टक्के इतकं मतदान झालंय. नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या बडोद्यामध्ये 70 टक्के मतदान झालंय. राज्यात 4 मतदान केंद्रांवर विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी बहिष्कार घातला होता.

तर उत्तर प्रदेशात 57 टक्के मतदान झालंय.उत्तर प्रदेशात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उभ्या असलेल्या रायबरेली मतदार संघात 48 टक्के मतदान झालंय. आणि उत्तर प्रदेशमध्ये 58 टक्के मतदान झालं. यूपीमध्ये एकूण 14 जागांसाठी मतदान झालं. लखनौमधून राजनाथ सिंग आणि काँग्रेसच्या रिटा बहुगुणा निवडणूक लढत आहेत. तर झाशीमधून उमा भारतीचं भवितव्य पणाला लागलंय. कानपूरमध्ये मुरली मनोहर जोशी उभे राहिलेत.

तेलंगणात 70 टक्के मतदान

तर आंध्र प्रदेशचं विभाजनाच्या घोषणेनंतर तेलंगणात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. तेलंगणामध्ये आज लोकसभेच्या 17 तर विधानसभेच्या 119 जागांसाठी आज मतदान झालं. या मतदानाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तेलंगणात तब्बल 70 टक्के मतदान झालंय. तेलंगणामध्ये काँग्रेस आणि टीआरएसमध्ये चुरस आहे. तर सीमांध्रामध्ये भाजप-टीडीपी युती आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत आहे.

प.बंगालमध्ये विक्रमी 81 टक्के मतदान

सातव्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झालंय. इथे 81 टक्के मतदान झालं. गेल्या वेळीही पश्चिम बंगालमध्ये चांगलं मतदान झालं होतं. पश्चिम बंगालमध्ये हावडा, हुगळी, सेरामपूर आणि बिरभूममध्ये चांगलं मतदान झालंय. पण, राज्यातल्या 9 मतदानसंघांमध्ये मतदान यंत्र पळवण्यासारखे गैरप्रकार झाल्याचा आरोप डाव्या पक्षांनी केलाय. त्यामुळे एकूण 800 मतदानकेंद्रांवर फेरमतदान घेण्याची मागणी त्यांनी केली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान

जम्मू आणि काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये मतदानाला कमी प्रतिसाद मिळला. इथे 26 टक्के मतदान झालं. गेल्या वेळी इथे 25 टक्के मतदान झालं होतं. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला श्रीनगरमधूनच निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढत ठरलीय. दरम्यान, श्रीनगरमध्ये निवडणुकीच्या ड्युटीवरून सुरक्षा जवान परतत असताना काही जणांनी दगडफेक सुरू केली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

किती टक्के मतदान झालं ?

मतदारसंघ        2014        2009

गुजरात                         62               48

प. बंगाल                      81                82

उत्तर प्रदेश                     57               48

तेलंगणा                       70                  -

पंजाब                           73                 70

बिहार                          60                45

जम्मू-काश्मीर           26                 25

दमण-दिव                  76                 73

दादरा-नगरहवेली     85                  73

*

आज होणार्‍या निवडणुकीमध्ये कोणत्या नेत्यांचं भविष्य मतदार ठरवणार आहेत त्यावर एक नजर टाकूया

रिंगणातले दिग्गज

 •  नरेंद्र मोदी - बडोदा, गुजरात
 •  लालकृष्ण अडवाणी - गांधीनगर, गुजरात
 •  सोनिया गांधी - राय बरेली, उत्तर प्रदेश
 •  राजनाथ सिंग विरुद्ध रिटा बहुगुणा जोशी - लखनौ, उत्तर प्रदेश
 •  मुरली मनोहर जोशी विरुद्द श्रीप्रकाश जैस्वाल - कानपूर, उत्तर प्रदेश
 •  अरूण जेटली विरुद्ध कॅप्टन अमरिंदर सिंग - अमृतसर, पंजाब
 •  उमा भारती - झाशी, उत्तर प्रदेश
 •  के चंद्रशेखर राव - मेडक, तेलंगणा
 •  एस जयपाल रेड्डी - मेहबूबनगर, तेलंगणा
 •  असादुद्दिन ओवैसी - हैदराबाद
 •  शरद यादव - मधेपुरा, बिहार
 •  चंदन मित्रा - हुगळी, पश्चिम बंगाल

गुजरात - 26

बडोदा मतदारसंघ

 • नरेंद्र मोदी - भाजप
 • मधुसूदन मिस्त्री - काँग्रेस
 • सुनील कुलकर्णी - आप

गांधीनगर मतदारसंघ

 • लालकृष्ण अडवाणी - भाजप
 • किरीट पटेल - काँग्रेस
 • रितुराज मेहता - आप

अहमदाबाद पूर्व

 • परेश रावल - भाजप
 • हिंमतसिंग पटेल - काँग्रेस
 • दिनेश वाघेला - आप

सूरत

 • नैशदभाई देसाई - काँग्रेस
 • दर्शनाबेन जर्दोश - भाजप
 • मोहनभाई पटेल - आप

खेडा

 • दिनशा पटेल - काँग्रेस
 • देवुसिंह चौहान - भाजप
 • लाभुभाई बढीवाला - आप

तेलंगणा - 17

आदिलाबाद

 • गोडाम नागेश - टीआरएस
 • नरेश जाधव - काँग्रेस
 • रमेश राठोड - टीडीपी
 • सदाशिव राठोड - बसपा

सिंकदराबाद

 • अब्दुल सत्तार मुजाहिद - अखिल भारतीय मुस्लिम लीग
 • बंडारू दत्तात्रय - भाजप
 • छाया मुन्शीपल्ली - आप
 • अंजन कुमार यादव - काँग्रेस
 • टी. भीमसेन - टीआरएस

मेडक

 • डॉ. पी स्वर्ण कुमार रेड्डी - काँग्रेस
 • के चंद्रशेखर राव - टीआरएस
 • नरेंद्रनाथ चांगला - भाजप

मेहबूबनगर

 • एस जयपाल रेड्डी - काँग्रेस
 • ए पी जितेंद्र रेड्डी - टीआरएस
 • डॉ. जनार्दन रेड्डी नागम् - भाजप

हैदराबाद

 • असादुद्दिन ओवैसी - एम.आय.एम
 • डॉ. भगवंत राव - भाजप
 • लुबना सर्वथ - आप
 • राशीद शरीफ - टीआरएस
 • वेणूगोपाल पी - बसपा

उत्तर प्रदेश - 14

रायबरेली

 • सोनिया गांधी - काँग्रेस
 • अजय अगरवाल - भाजप
 • प्रवेश सिंग - बसपा

लखनौ

 • राजनाथ सिंग - भाजप
 • रिटा बहुगुणा जोशी - काँग्रेस
 • नकुल दुबे - बसपा
 • जावेद जाफरी - आप
 • अभिशेष मिश्रा - सपा

कानपूर

 • श्रीप्रकाश जैस्वाल - काँग्रेस
 • मुरलीमनोहर जोशी - भाजप
 • सलीम अहमद - बसपा
 • सुरेंद्र अग्रवाल - सपा

झाशी

 • उमा भारती - भाजप
 • अनुराधा शर्मा - बसपा
 • प्रदीप कुमार जैन - काँग्रेस
 • चंद्रपाल सिंग यादव - सपा
 • अर्चना - आप

पंजाब - 13

अमृतसर

 • अरूण जेटली - भाजप
 • कॅप्टन अमरिंदर सिंग - काँग्रेस
 • दलजित सिंग - आप

पश्चिम बंगाल - 9

हावडा

 • जॉर्ज बेकर - भाजप
 • मनोज कुमार पांडे - काँग्रेस
 • प्रसून बॅनर्जी - तृणमूल
 • शिबचंद्र राम - बसपा
 • श्रीदीप भट्टाचार्य - सीपीआय एम
 • सूरज नारायण सिंग - आप

बिरभूम

 • जॉय बॅनर्जी - भाजप
 • सिराज सय्यद - काँग्रेस
 • शताब्दी रॉय बॅनर्जी - तृणमूल
 • काम्रे इलाही मोहम्मद - सीपीआय (एम)

हुगळी

 • डॉ. चंदन मित्रा - भाजप
 • रतन डे - तृणमूल
 • विजय कुमार महातो - बसपा
 • प्रदीप साहा - सीपीआय एम

बिहार - 7

माधेपुरा

 • शरद यादव - जेडीयू
 • पप्पू यादव - आरजेडी
 • विजय कुशवाहा - भाजप

 

मधुबनी

 • अब्दुल बरी सिद्दीकी - आरजेडी
 • हरी नारायण यादव - बसपा
 • हुकुमदेव नारायण यादव - भाजप
 • नीरज पाठक - आप
 • प्रो. गुलाम गौस - जेडीयू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2014 09:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close