S M L

मोदींविरोधात एफआयआर दाखल करा, आयोगाचे आदेश

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2014 03:16 PM IST

मोदींविरोधात एफआयआर दाखल करा, आयोगाचे आदेश

gmodi_voting_badoda30 एप्रिल : आपल्याच पक्षाच्या कमळ चिन्हामुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी गोत्यात आले आहे. आज सकाळी (बुधवारी) मोदींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारपरिषदेदरम्यान त्यांनी भाजपचं चिन्हं हातात धरलं होतं. याप्रकरणी निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना दणका दिला.

गुजरातमधल्या संबंधित अधिकार्‍यांना मोदींविरोधात कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. तसंच नरेंद्र मोदी आणि इतरांवर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने गुजरातच्या निवडणूक अधिकार्‍यांना दिलेल्या आहे.

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 (1ब) नुसार कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. या कलमानुसार आचारसंहितेच्या काळात कोणत्याही उमेदवाराला निवडणूक चिन्ह दाखवण्यावर बंदी आहे. सोबतच ही दृश्यं दाखवणार्‍या चॅनल्स आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरही कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र भाजपने मोदींची पाठराखण केलीय. मोदींकडून आचारसंहितेचा भंग झाला नाही, असा बचाव भाजपनेचे सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. तर मोदींची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणीही काँग्रेसनी केली आहे. आम आदमी पार्टीही मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.

काय आहे लोकप्रतिनिधी कायद्याचं 126 कलम ?

  • - मतदान संपेपर्यंतच्या वेळेच्या आधी 48 तासांमध्ये कोणत्याही प्रकारची सभा घेण्यावर बंदी
  • - निवडणुकीशी संबंधित सभेचं आयोजन करू शकत नाही, सहभागी होऊ शकत नाही, सभेला संबोधित करू शकत नाही
  • - निवडणुकीशी संबंधित कुठलीही गोष्ट चित्रफीत, टीव्ही किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे दाखवू शकत नाही
  • - कुठल्याही निवडणुकीसाठी कुठल्याही मतदानकेंद्राच्या परिसरात मतदानाच्या 48 तास आधी कुठल्याही प्रकारे निवडणूक प्रचारासाठी लोकांना आकर्षित
  • - करण्याच्या उद्देशाने म्युझिक कॉन्सर्ट किंवा नाटक किंवा इतर कोणत्याही मनोरंजनाच्या पद्धतीचा अवलंब करता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2014 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close