S M L

लोकसभा शेवटच्या टप्प्यात, आठव्या फेरीत 7 मेला मतदान

Sachin Salve | Updated On: May 1, 2014 07:51 PM IST

mizoram-mnf-and-mpc-reach-poll-agreement-for-assembly-elections_18101308293101 मे : लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. 9 टप्प्यांपैकी आतापर्यंत 7 टप्प्यांचं मतदान पूर्ण झालंय. यापुढचं म्हणजे आठव्या फेरीतलं मतदान 7 मे रोजी म्हणजे येत्या बुधवारी होतंय.

यामध्ये सीमांध्र भागातल्या 25 जागांसाठी, बिहारच्या 7, हिमाचल प्रदेशच्या 4 जागांसाठी, जम्मू- काश्मीरच्या 2, उत्तर प्रदेशच्या 15, उत्तराखंडच्या सर्वच्या सर्व म्हणजे 5 जागांसाठी, पश्चिम बंगालच्या 6 अशा 7 राज्यांच्या 64 जागांसाठी मतदान होतंय. यामध्ये उत्तरप्रदेशमध्ये अमेठी, सुलतानपूर हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत.

बिहारमध्ये राबडी देवींचा सारण, रामविलास पासवानांचा हाजीपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला या संवेदनशील मतदारसंघात 7 तारखेला मतदान होईल. हिमाचलच्या सर्व जागांवर मतदान होईल. हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग या मंडी या मतदारसंघातून रिंगणात आहेत. तर पश्चिम बंगालमधील बांकुरामधून वासुदेव आचार्य रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2014 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close