S M L

मोदी पंतप्रधान झाल्यास महिलांच्या सुरक्षेची काळजी वाटते -शिंदे

Sachin Salve | Updated On: May 2, 2014 05:01 PM IST

मोदी पंतप्रधान झाल्यास महिलांच्या सुरक्षेची काळजी वाटते -शिंदे

545shinde_modi02 मे : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर या देशातल्या महिलांच्या सुरक्षेची मला काळजी वाटते, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींवर टीका केलीय. गुजरातमधल्या तरुणीवर पाळत प्रकरणी ते बोलत होते.

या प्रकणाची आता चौकशी होणार आहे. चौकशी समितीच्या अध्यक्षपदी न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. 16 मेपूर्वी म्हणजे नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी ही चौकशी समिती नेमण्याचा केंद्राचा विचार आहे. पण, सरकार मोदींना घाबरल्यामुळे सरकार असं पाऊल उचलत असल्याची टीका भाजप नेते अरुण जेटली यांनी केलीये.

पण, या चौकशी समितीवर न्यायाधीशाची नेमणूक केली जाणार नाही, अशी आशा आपल्याला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मोदींच्या आदेशावरून गुजरात पोलिसांनी तिथल्या एका आर्किटेक्ट तरुणीचे फोन टॅप केले आणि तिचा पाठलागही केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुजरात सरकारनं तपास पूर्ण केलाय. पण, त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2014 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close