S M L

आसाम धुमसतंय, आतापर्यंत 32 जणांचा बळी

Sachin Salve | Updated On: May 4, 2014 12:18 PM IST

आसाम धुमसतंय, आतापर्यंत 32 जणांचा बळी

assam_3mayअरिजित सेन,गुवाहाटी

03 मे : गेल्या दोन दिवसांपासून कोक्राझार आणि बक्सा झालेल्या हिंसाचारामुळे आसाममधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. देशात निवडणुकीचं वातावरण असतानाच या हिंसाचारात 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोक्राझार आणि बक्सा भाग पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडलाय. या हिंसाचारात आत्तापर्यंत मुस्लिम समाजाचे जवळपास 32 जणांची हत्या झाल्याचं समोर येतंय. यात जास्त करुन महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

या हिंसाचाराची जबाबदारी आत्तापर्यंत कोणीही घेतली नसली तरी स्वतंत्र बोडोलँडसाठी झगडणार्‍या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँटकडे संशयाची सुई जातेय. पोलिसांनी आत्तापर्यंत बक्सामधून 14 तर कोक्राझारमधून 8 जणांना म्हणजे एकूण 22 जणांना अटक केली आहे. कोर्काझार, बक्सा आणि चिरांग या तीन जिल्ह्यात संचारबंदी लागू केली गेली आहे.

निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पण या हिंसाचाराचंही राजकारणं केलं गेलंय. जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी या हिंसाचाराला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं म्हटलंय. तर काँग्रेसनंही भाजप आणि मोदींवर देशात फूट पाडण्याचा आरोप केला आहे. तर भाजपनं काँग्रेसवर पलटवार केलाय.

2012 प्रमाणे याहीवेळी कोक्राझारमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. चिंतेची बाब म्हणजे बोडो अतिरेक्यांनी नागरिकांनी अगदी सहजपणे केलेले हल्ले.पण दुखःद गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या वर्षी देशांतर्गत सुरक्षा आणि अशा हिंसाचाराला आळा घालण्यावर न बोलता सर्व राजकीय पक्ष या हिंसाचाराचं राजकारण करण्यात मग्न आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2014 08:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close