S M L

गांधीनगर मतदारसंघातून मल्लिका साराभाई लढवणार निवडणूक ; लवकरच मुंबईतही प्रचारासाठी आगमन

6 एप्रिल, गांधीनगरअलका धुपकरगुजरातमधल्या गांधीनगर या मतदारसंघातून प्रसिद्ध नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्त्या मल्लिका साराभाई निवडणूक लढवताहेत. निवडणुकीसाठी त्यांनी देशभरातल्या नागरिकांना निधीच्या मदतीचं आवाहनही केलं आहे. गुजरातची हिंदुत्ववादी भूमिका बदलून त्यांना गुजरातची धर्मनिरपेक्ष ओळख कायम ठेवायची आहे. भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्यांगना ही मल्लिका यांची पहिली ओळख. नृत्यांगना मृणालिनी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाईंची ती मुलगी. पण फक्त दर्पणा डान्स अकॅडमीपर्यंत मल्लिका यांचं काम थांबलेलं नाही. आजवर गुजरात दंगलग्रस्तांसाठी मल्लिकानं काम करून नरेंद्र मोदींच्या हिंदुत्त्ववादाला थेट आव्हानच दिलं आहे. आता मल्लिका लालकृष्ण अडवाणींच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. हिंदुत्त्ववादाला त्यांनी केलेल्या कडव्या विरोधामुळे त्यांचं कौतुकंच होतंय. हे पाऊल उचलून डिपॉझिट जप्त झालं तरी बेहत्तर पण मोदी आणि अडवाणींच्या हिंदुत्त्ववादाविरोधात वैचारिक भूमिका घेण्याची हीच राजकीय वेळ असल्याचं मल्लिका यांनी दाखवून दिलंय. त्यांनी जोरदार प्रचारही सुरु केला असून त्यासाठी होणारा खर्च त्या जनतेकडून दान मागणार आहेत. गुजरातची मुंबईशी असलेली नाळ लक्षात घेऊन मल्लिका साराभाई मुंबईतही लवकरचप्रचारासाठी येणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2009 11:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2009 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close