S M L

आसाममध्ये 2 संशयित बोडो अतिरेक्यांना केलं ठार

Samruddha Bhambure | Updated On: May 4, 2014 07:32 PM IST

आसाममध्ये 2 संशयित बोडो अतिरेक्यांना केलं ठार

Protest in Guwahati04 मे :  आसाममध्ये 2 संशयित बोडो अतिरेक्यांना सुरक्षा अधिकार्‍यांनी आज ठार केलं आहे. आसममधल्या कोक्राझार, चिरांग आणि बक्सा जिल्ह्यांत आता शांतता आहे, पण भीतीचं वातावरण कायम आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये काल बोडो हल्ला केला होता. या अतिरेकी हल्ल्यात 32 जण ठार झाले आहे. त्यानंतर परत कोणतीही हिंसाचाराची घटना घडलेली नाही.

काल हिंसाचार झालेल्या परिसरात अजूनही कर्फ्यू कायम ठेवण्यात आलेला आहे. केंद्रीय निम लष्करी दलाच्या 53 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, तर सैन्याच्या 15 तुकड्याही तैनात करण्यात आल्या. सुरक्षा दलांनी आसाम-अरुणाचलच्या सीमेवर दोन संशयित बोडोंना कंठस्नान घातलं आहे. या दोन बोडोंचा हत्याकांडामध्ये समावेश होता असं सांगण्यात येतं आहे.

दरम्यान, निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पण या हिंसाचाराचंही राजकारणं केलं गेलं आहे. या हिंसेमुळे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यावर टीका सुरू झाली आहे. इतर राजकीय पक्षही या निमित्तानं एकमेकांवर टीका करताहेत.जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी या हिंसाचाराला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेसनंही भाजप आणि मोदींवर देशात फूट पाडण्याचा आरोप केला आहे. तर भाजपनं काँग्रेसवर पलटवार केला आहे.

2012 प्रमाणे याहीवेळी कोक्राझारमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. चिंतेची बाब म्हणजे बोडो अतिरेक्यांनी नागरिकांनी अगदी सहजपणे केलेले हल्ले पण दुखःद गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या वर्षी देशांतर्गत सुरक्षा आणि अशा हिंसाचाराला आळा घालण्यावर न बोलता सर्व राजकीय पक्ष या हिंसाचाराचं राजकारण करण्यात मग्न आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2014 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close