S M L

उत्तरप्रदेशात भाजपचा पुन्हा 'जय श्रीराम'चा नारा

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2014 07:08 PM IST

उत्तरप्रदेशात भाजपचा पुन्हा 'जय श्रीराम'चा नारा

modi says jai shree ram05 मे :  लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यांत 'जय श्रीराम'चा नारा देऊन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

नरेंद्र मोदींची आज उत्तरप्रदेशातल्या फैजाबादमध्ये सभा झाली. या सभेच्या स्टेजवर प्रस्तावित राममंदिराची प्रतिमा होती. तसंच श्रीरामाचा फोटो होता. याबाबत कॉंग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे.

 सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीरामा'च्या घोषणाही दिल्या. श्रीरामाच्या जन्मभूमीत कमळ फुलेल, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भाषणादरम्यान त्यांनी अनेकदा भगवान राम यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे कॉंग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मोदींनी आचार संहितेचा उल्लंघन केले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. फैजापूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर अयोध्या आहे. भगवान राम यांचा तिथे जन्म झाला आहे.निवडणुकीच्या काळात धार्मिक चिन्हांचा वापर करण्यावर बंदी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ फुटेजची आणि अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोदी म्हणाले, 'महात्मा गांधीजींनाही देशात रामराज्या हवं होतं. त्यामुळे राम राज्य झाले पाहिजे. राम राज्य म्हणजे सर्वांचा विकास. व्होट बॅंकेच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले आहे.'

दरम्यान, उत्तर प्रदेशात राजकीय फायदा व्हावा, यासाठी भाजप पुन्हा जातीयवादावर उतरलंय, अशी टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2014 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close