S M L

मायलेकाचं सरकार जाणार, अमेठीतल्या जाहीर सभेत मोदींची टीका

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2014 07:42 PM IST

modi05 मे :  या मायलेकांनी जनतेचा विश्वासघात केला, ही देशाला लुटणारी टोळी आहे, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज केला.

नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या अमेठीत प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर घणाघाती हल्लाबोल चढवला. अमेठीतून भाजप उमेदवार असलेल्या स्मृती इराणी या आपल्या लहान बहीण आहेत, असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. अमेठीत अाज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. येत्या 7 मे रोजी येथे मतदान होणार आहे.

अमेठीतल्या विकासाच्या मुद्यावरून त्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं. कॉंग्रेसच्या आई -मुलाचे सरकार जाणार असल्याचे संपूर्ण देशाला माहीत आहे. उत्तर प्रदेशात अमेठीची स्थिती फारच वाईट आहे. साठ महिन्यांतच अमेठीचा विकास करणार असल्याचे आश्वासन मोदींनी अमेठीतील जनतेला दिले. अमेठीतील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपने स्मृती इराणींंना उमेदवारी दिल्याचे मोदींनी सांगितले. अमेठीतून कमळ पाठवून भाजपला आणखी मजबूत करण्‍याचे आवाहन मोदींनी यावेळी दिले.

मोदी म्हणाले, आई- मुलाच्या सरकारचे दिवस भरले आहेत. भाजपला आता सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही. आम्ही बदला घेण्यासाठी नाही, बदल घडवविण्‍यासाठी राजकारण करतो. यंदाची निवडणूक सगळ्यांना थक्क करणारी असेल. मला अमेठीत शेतकर्‍यांसाठी काम करायचं, तरुणांना रोजगार द्यायचाय, इथला विकास करायचाय आणि 2019मध्ये इथे येऊन मी हिशोब देईन, असं म्हणत नरेंद्र मोदींनी अमेठीतल्या मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. इथल्या पायाभूत सुविधांविषयी गांधी कुटुंबाला प्रश्न विचारला तर तो राज्य सरकारचा विषय असल्याचं कारण ते देतात. पण, भाजप सत्तेत आल्यावर अमेठीच्या विकासासाठी विरोधकांचीही मदत घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तुम्ही चाळीस वर्षं एका कुटुंबाला मत दिलं आता एक संधी या सेवकाला द्या, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं.

राजकीय पंडितांचे सर्व अंदाज खोटे ठरणार आहे. अमेठीत चाळीस वर्षांपासून एक राजघराण्याने  जनतेच्या भावनांशी खेळत आहे. अमेठीत 'अ'पासून सुरुवात करावी लागणार असल्याचेही मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2014 07:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close