S M L

शाळांमध्ये मातृभाषेची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2014 10:37 PM IST

शाळांमध्ये मातृभाषेची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट

supreme court school06  मे :  शाळेत माध्यम म्हणून मातृभाषेची सक्ती करता येणार नाही, सक्ती केली तर ते मुलभूत हक्कांचं उल्लंघन असेल असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कर्नाटकमधील सर्व प्राथमिक शाळांमध्ये कन्नड भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत निर्णय देताना आज सुप्रीम कोर्टाने शाळांमध्ये मातृभाषेची सक्ती नको, असा निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्नाटक सरकारला मोठा हादरा बसला आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये कन्नड भाषेचे शिक्षण सक्तीचे केले होते. गेल्या 20 वर्षांपासून तो या निर्णयाविरोधात लढत आहे. अखेर आज त्याच्या लढ्याला यश आले आहे.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने शाळांमध्ये मातृभाषेची सक्ती करणे, ही मुलभूत हक्कांची उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शोळेत माध्यम म्हणून मातृभाषेची सक्ती करता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2014 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close