S M L

मोदी नीच राजकारणी, जनता माफ नाही करणार -प्रियांका गांधी

Sachin Salve | Updated On: May 6, 2014 05:59 PM IST

मोदी नीच राजकारणी, जनता माफ नाही करणार -प्रियांका गांधी

priaynka_vs_modi4406 मे : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातलं शाब्दिक युद्ध सुरूच आहे. अमेठीमध्ये माझ्या शहीद वडिलांचा नरेंद्र मोदींनी अपमान केलाय, त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे अमेठीची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांच्या या नीच राजकारणाला मतदान केंद्रावर आमचे कार्यकर्ते चोख उत्तर देतील अशी घणाघाती टीका प्रियांका गांधी यांनी केली.

तर प्रियांका गांधींच्या टीकेला नरेंद्र मोदींनीही लगेच प्रत्युत्तर दिलं. मोदी चहावाला आहे असं म्हणून हिनवलं जातंय. आपण मागास जातीतले असल्यामुळेच आपल्यावर टीका होत आहे. आम्हाला नीच म्हणून नका असा सल्लावजा टोला नरेंद्र मोदी यांनी प्रियांकांना लगावला. उत्तर प्रदेशच्या दोमरियागंजमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. विशेष म्हणजे विकासाची भाषा करणारे नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणात जातीवर भर दिला.

पण गांधी विरुद्ध मोदी हे युद्ध सुरूच आहे. गुजरात मॉडेलची पोल खोल केल्यानंतर मोदींनी गुजरात मॉडेलची चर्चा बंद केली. भारतीय तरुणांच्या शक्तीची अमेरिकेच्या अध्यक्षांना भीती वाटते, पण मोदी म्हणतात तरुणांसाठी काय केलं, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली. उत्तर प्रदेशात मिर्झापूरमधल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. विशेष म्हणजे नेहमी मोदींचा उल्लेख टाळून टीका करणारे राहुल गांधी आता नाव घेऊन उघडपणे टीका करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2014 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close