S M L

मोदींच्या कार्यक्रमाला परवानगी पण जेटली आंदोलनावर ठाम

Samruddha Bhambure | Updated On: May 8, 2014 03:25 PM IST

मोदींच्या कार्यक्रमाला परवानगी पण जेटली आंदोलनावर ठाम

varansi road show modi08 मे :नरेंद्र मोदींची गंगा आरती आणि सभेवरून वारणसीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत भाजपनं वाराणसी आणि दिल्लीत निदर्शनं सुरू केली आहेत. भाजपचे दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. भाजपचे नेते अमित शाह, मुख्तार अब्बास नक्वी, व्यंकय्या नायडू हे सगळे नेते वाराणसीच्या आंदोलनात आहेत तर  डॉ. हर्षवर्धन दिल्लीतल्या निदर्शनांचं नेतृत्व करताय आहेत.

नरेंद्र मोदींच्या रॅलीची परवानगी सुरक्षेच्या कारणास्तव नाकारली असली तरी गंगा आरतीसाठी आणि हॉटेलमधील कॉन्फरन्ससाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. पण आता गंगा आरती न करण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. ही परवानगी खूपच उशीरा आल्याचं भाजपने म्हटलं आहे. गंगा आरती करू शकत नसल्याबद्दल नरेंद्र मोदींनीही आज सकाळी ट्विट करून खेद व्यक्त केला आहे.

गंगा आरतीसाठी आयोगाकडून परवानगी मिळूनही नरेंद्र मोदींनी आजची गंगा आरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवरून त्यांनी याविषयीचा खेद व्यक्त केला आहे.

  • आज गंगामातेची आरती करू शकत नाही याबद्दल खेद
  • कार्यकर्त्यांनी संयश आणि शांतता पाळावी
  • सर्वसामान्यांना त्रास होईल असं वागू नये
  • निवडणूक आयोगानं निपक्षपातीपणा दाखवला नाही
  • त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना सत्याग्रह करावा लागतोय

निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांनी काल रात्री भाजपला 2 कार्यक्रमांसाठीची परवानगी दिली. पण वाराणसीमध्ये आंदोलन सुरू केलं. सुरक्षेच्या कारणांस्तव परवानगी नाकारल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. तर पुरेशी सुरक्षा व्यवस्था देता येत नसेल तर निवडणूकाच घेऊ नका अशा शब्दांत अरूण जेटलींनी आयोगावर टीका केलीय.

यापूर्वी नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधल्या एका सभेला, एका रोड शोला आणि गंगा आरतीला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या भाजपने निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाविरोधात आगपाखड केलं आहे. रॅलीसाठी परवानगी नाकारमुळे निवडणूक अधिकारी प्रांजल यादव पक्षपात करतायत, असा आरोप करत अरूण जेटलींनी त्यांच्या बदलीची मागणी केली. याचा निषेध म्हणून भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आज निवडणूक आयोगाविरोधात वाराणसी आणि दिल्लीमध्ये निदर्शनं करणार आहे. परवानगी मिळूनही हे आंदोलन शांततामय मार्गाने केलं जाईल असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. तर मोदींच्या सभेला नाकारण्यात आलेली परवानगी ही सुरक्षेच्या कारणास्तव होती आणि भाजपने त्याचा निषेध करायचं ठरवल्याचं खेदजनक असल्याचं निवडणूक आयोगाने अरूण जेटलींना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

येत्या 12 मे रोजी वाराणसीमधल्या या महत्त्वाच्या लढती होणार आहेत. नरेंद्र मोदी विरूद्ध अरविंद केजरीवाल यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. वाराणसीत या वाढत्या तणावांमुळे अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल 25000 जवान वाराणसीमध्ये तैनात करण्यात आले आहेत. वाराणसीत 16 लाख मतदार आहेत म्हणजे दर 64 मतदारांमागे 1 जवान तैनात करण्यात आलाय. एकट्या बनारसमध्ये पॅरा मिलटरी फोर्सेसच्या 12 कंपनी, रॅपिड ऍक्शन फोर्सच्या 9 कंपनी आणि जिल्हा पोलिसांचे 12000 जवान तैनात करण्यात आलेले आहेत.

निवडणूक आयोगाने अरूण जेटलींच्या पत्राला उत्तर दिलं आहे.

निवडणूक आयोगाचं उत्तर

'नियमांचं पालन करून आणि प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन हे प्रकरण हाताळणं जाणं अपेक्षित असताना आपल्या पक्षाने निषेध करण्याचं ठरवलं याचं निवडणूक आयोगाला आश्चर्य वाटतंय आणि याचा खेदही वाटतोय. आपल्या एकूण तीनपैकी दोन कार्यक्रमांना - गंगापूजन आणि प्रतिष्ठित नागरिकांसोबतची बैठक, याला जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी परवानगी दिलेली आहे. सुरक्षेच्या आणि इतर कारणांस्तव रॅलीसाठीच्या परवानगीविषयी विचार करण्यात येत आहे.

या सगळ्या प्रकरणात आयोगाने जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांसोबतच राज्याचे मुख्य सचिव आणि डीआयजी यांचाही सल्ला घेतला आणि त्यांनीही सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.'

भाजप नेते अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आज निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे आणि अप्रत्यक्षपणे पक्षपातीपणाचा आरोप कोला आहे.

जेटलींची निवडणूक आयोगावर टीका

'नरेंद्र मोदींच्या सभेला परवानगी नाकारताना निवडणूक आयोगानं सुरक्षेचं कारण दिलं आहे. जर पुरेशी सुरक्षा दिली जाईल याची खबरदारी घेऊ शकत नसाल, तर देशात निवडणुका घेऊ नका. पण निवडणुका घेत असाल तर निपक्षपातीपणे वागा. प्रचार करणं हा उमेदवाराचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. राहुल गांधी वाराणसीत रोड शो करू शकतात पण नरेंद्र मोदी रॅली घेऊ शकत नाहीत. सुरक्षेचा मुद्दा हा निवडकपणे वापरला जातो.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2014 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close