S M L

'भाजपचा हा ड्रामा, ढोंगीपणा'

Sachin Salve | Updated On: May 8, 2014 05:36 PM IST

'भाजपचा हा ड्रामा, ढोंगीपणा'

634aapvsbjp08 मे : निवडणूक आयोग विरुद्ध भाजप पेटलेल्या संघर्षाचा आम आदमी पार्टी, बसपा आणि समाजवादी पार्टीने चांगलाच समाचार घेतला. भाजपचा हा ड्रामा आहे त्यांचे सगळे नेते नाटकं करत आहे.

भाजप घाबरली असून त्यांना त्यांचापराभव दिसत आहेत त्यामुळे भाजप एकवटलीय. या अगोदर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी बडोद्यात आंदोलनं केलं नाही मग वाराणसीमध्ये एका रॅलीला परवानगी काय नाकारली सर्वच नेते धावून आले आहेत हे नाटकं आहे अशी बोचरी टीका आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली.

तर बसपा नेत्या मायावती यांनी भाजप आणि आपवर टीका केली. वाराणसीमध्ये भाजप आणि आपने जनसमुदायाला भडकवण्याचं काम केलंय. पण यामधून फायदा होत नसल्यामुळे वाराणसीमध्ये भाजपने सेटिंग करून वाद निर्माण केलाय. हे भाजपचं नाटक आहे अशी खरमरीत टीका मायावती यांनी केली.

तर भाजप ढोंगी आहे, त्यांचा हा ढोंगीपणा जनतेला चांगला माहित असून वाराणसीची जनता त्यांना चांगला धडा शिकवेल अशी टीका सपाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2014 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close